News

रेशन कार्डाची गणना महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये होत असते. या कार्डच्या मदतीने आपल्याला कमी पैशात धान्य मिळते, याशिवाय अनेक शासकीय योजनांसाठी किंवा इतर कामांसाठी रेशन कार्डची विचारणा होत असते. रेशन कार्ड हे आपण संबंधित गावातील रहिवाशी आहोत याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणारे कागदपत्र आहे.

Updated on 17 July, 2020 8:03 PM IST


रेशन कार्डाची गणना महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये होत असते. या कार्डच्या मदतीने आपल्याला कमी पैशात धान्य मिळते, याशिवाय अनेक शासकीय योजनांसाठी किंवा इतर कामांसाठी रेशन कार्डची विचारणा होत असते. रेशन कार्ड हे आपण संबंधित गावातील रहिवाशी आहोत याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणारे कागदपत्र आहे. दरम्यान सरकारने या लॉकडाऊनच्या काळात रेशन कार्डधारकांसाठी मोफत धान्य योजना राबवली. यामुळे अशा सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक असते. शिवाय कार्डवरील सर्व माहिती योग्यरित्या नमूद करण्यात आलेली असावी, अन्यथा आपल्याला परत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

आता रेशनिंग हळूहळू ऑनलाईन होत आहे. यासाठी कार्डवरती घरातील प्रमुखाचा नंबर नोंदवला जात आहे. पण मोबाईल नंबर नोंदवत असताना सावधनगिरी बाळगावी लागते. परंतु अनेकजण आपला मोबाईल नंबर बदलतात  आणि बदल केलेला  नवीन नंबर रेशनकार्डवर नमुद केला जात नसल्याने उपभोगत्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.  आज आपण या लेखातून  जाणून घेणार आहोत, जर आपला नंबर बदलला तर रेशनकार्डवर तो अपडेट कसा करायचा.

रेशनकार्डवर मोबाईल नंबर अपडेट करणे - (Updating mobile number in ration card)
आता तुम्ही म्हणाल रेशन कार्डवर मोबाईल नंबर कसा अपडेट करणार, याचा विचार तुम्ही करत आहात ना? मोबाईल नंबर अपडेट करणे हे एकदम सोपे काम आहे. हे काम तुम्ही घरी बसून सुद्धा करु शकता. फक्त यासाठी तुम्हाला राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या पोर्टलवर जावे लागेल.  तेथे ‘Register/Change of Mobile No’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.  येथे आपला नवा नंबर नोंदवा लागेल. पंधरा दिवसाच्या आत आपला अर्ज स्वीकारला जाईल, यास आपल्याला नवीन अपडेट रेशन कार्ड मिळेल.  प्रत्येक राज्यांची वेबसाईट वेगळी असल्याने ‘Register/Change of Mobile No’ हा पर्याय आपल्याला शोधावा लागेल.

English Summary: Change the mobile number on the ration card at home; know the process and benefits
Published on: 17 July 2020, 04:59 IST