पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यांत विभागून दिले जातात.
.शेतकऱ्यांना फायद्याची असलेल्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी असे बरेचअसे बदल करण्यात येत आहेत.ज्यायोगे शेतकऱ्यांच्या समस्या कमी होतील.या योजनेसाठी लाभार्थी चा शोध घेण्यासाठी आता गावपातळीवर कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे.त्यामुळे जवळजवळ सहा लाख शेतकऱ्यांची झालेली गैरसोय यामुळे दूर होणार आहे.जर या योजनेचा विचार केला तरपी एम किसान योजनेचा हप्तासंबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी बँक खाते गरजेचे होते.परंतु आता त्या मध्ये देखील बदल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आता कृषी विभागाच्या सूचनेनुसार योजना आता शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आली आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांना बँक खाते संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.आधार क्रमांकाच्या साह्याने थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.कृषी विभागाने केलेल्या बदलामुळे आता जेव्हाअकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईलत्या अगोदर या नवीन प्रणालीचा वापर करूनअकरावा हप्ता जमा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
अगोदर या योजनेच्या रक्कम ही बँक खात्यावर अवलंबून होती.परंतु आता शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार चापर्याय दिल्याने शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.कृषी विभागाने केंद्र सरकारकडे केलेल्या या मागणीला मंजुरी मिळाली असून तब्बल सहा लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
Published on: 01 March 2022, 08:42 IST