News

द्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. तर चंद्रावर मोहीम फत्ते करणारा भारत चौथा देश ठरला आहे.

Updated on 23 August, 2023 6:15 PM IST

इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत शिरलं आहे. चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेली आहेत.

चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. तर चंद्रावर मोहीम फत्ते करणारा भारत चौथा देश ठरला आहे. चंद्राच्या अभ्यास करण्यास यामुळे मोलाची मदत होणार आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. 40 दिवसांचा प्रवास करत चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं आहे. आता चंद्रावरील पुढच्या अभ्यास सुरु होणार आहे.

दरम्यान, लँडिंगआधी चांद्रयाना 3 ची एक महत्त्वाची चाचणी केली गेली. चांद्रयान लँडरचे फ्यूएल पॅरामीटर्स तपासले गेले. ते फायर करुन योग्य रितीने चालतात की नाही हे तपासण्यात आले. जर त्या चाचणीचा रिपोर्ट ओके आली. यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात आली.

English Summary: Chandrayaan-3's successful landing on the Moon; India is proud
Published on: 23 August 2023, 06:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)