News

मुंबई: राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.

Updated on 23 January, 2019 8:37 AM IST


मुंबई:
राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील कमाल तापमान कमी होतील आणि किमान 29 जानेवारीपर्यंत तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहतील. वाढलेल्या आर्द्रतेमुळे दि. 25 ते 27 जानेवारी या काळात काही प्रमाणात धुक पडेल. या दरम्यान मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील.

शेतकऱ्यांनी या हवामानाची स्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्या स्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली आणि पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

English Summary: Chances of Rainfall in Vidarbha between 24th and 26th January
Published on: 23 January 2019, 08:35 IST