News

मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे दि. 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांत देखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Updated on 19 February, 2019 8:01 AM IST


मुंबई:
विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे दि. 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांत देखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन दि. 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

English Summary: Chances of rainfall in Vidarbha and Marathwada between 20-21th Feburary
Published on: 19 February 2019, 07:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)