गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या स्वरुपाच्या सरी बसरत आहे. आज कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग खानदेशातील नाशि, नगर, पुणे, सातारा, सांगली. सोलापूर, या जिल्ह्यात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती मागील तीन दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हलका पाऊस पडत आहे.
तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याची नोंद झाली. तर गुहागरमध्ये १२० मिलीमीटर पाऊस पडल्याने ओढ्यांना पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भात काढणीची कामे खोळंबल्याची स्थिती आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामान असून अधूनमधून ऊन पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागात हवामान राहील, उद्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, पुणे, नाशि, नगर , सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. तर इतर भागात काही प्रमाणात उघडीप राहील. मध्य महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर , पुणे, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले होते.
विदर्भातही हलक्या स्वरुपाचा पाऊस होणाल असल्याचा अंदाज आहे. दरम्यान परतीच्या पावसाच्या प्रवासाला सुरुवात झधाली आहे. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांतून माघारी फिरलेल्या परतीच्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. शनिवारी राजस्थान बहुतांशी भाग उत्तर प्रदेशाच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. २८ सप्टेंबरपासून मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. त्यानंतर हळूहळू माघारी सरकत आहे. त्यामुळे पावसाची उघडीप होत आहे.
Published on: 04 October 2020, 09:32 IST