1. बातम्या

विदर्भ अन् कोकणात पाऊस पडण्याची शक्यता


राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली असून काही भागात उष्णता वाढली आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. आज कोकणासह विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणत तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगनागरपासून बिहारच्या पारटणापर्यंत असून त्यानंतर हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने दक्षिण कोकणात जोरदार पाऊस पडत आहे.

तर देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये २० जुलै ते २१ जुलै पर्यंत डोंगराळ प्रदेशात जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या दिल्ली - एनसीआर-बिहार व पश्चिमी उत्तर प्रदेशाच्या अनेक भागात मध्यम आणि जोरदार पाऊस होण्याचा अंदाज बवामान विभागाने वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशात २० जुलै म्हणजे आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्कायमेटनुसार, दोन ते तीन दिवसात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तर पश्चिमी मध्यप्रदेशातही कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर दक्षिणातील कर्नाटक आणि केरळमध्ये मॉन्सूनचा जोर कायम राहणार असून तेथे जोरदार पाऊस होणार आहे.

तमिळनाडूच्या काही भागात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. दरम्यान रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे १३० तर वेंगुर्ला येथे ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरावरुन होत असलेल्या बाष्पाचा पुरवठ्यामुळे विदर्भातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters