शेतीसाठी पाऊस हा खूप महत्वाचा तसेच गरजेचा आहे. त्यामुळे बळीराजा पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असतो. गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यात मान्सून ला सुरुवात झाली होती. काही ठिकाणी मुसधार तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला आहे.
येत्या 24 तासात या भागात मुसळधार पावसाची शक्यता:-
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासामधे राज्यातील
विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे शिवाय उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सर्वाधिक ११० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, तळकोकणात विजांसह पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा:-लसूण आणि तूपाचं रोज एकत्र करा सेवन, आरोग्याला मिळतील अनेक फायदे
तसेच याच बरोबर उर्वरित महाराष्ट्र राज्यातील काही भागांत हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामधे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. काल पश्चिम महाराष्ट्र भागात अनेक ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस पडला आहे त्यामुळे येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मुबलक पाऊस पडला आहे परंतु राज्यात असेही काही भाग आहेत तिथ अजिबात सुद्धा पाऊस झाला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. ऐन हंगामाच्या वेळी पावसाने दडी मारल्यामुळे परभणी उस्मानाबाद भागातील पिके करपून चालली आहे. वेळेत पाऊस न पडल्यामुळे येथील शेतकरी वर्गावर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Published on: 06 September 2022, 12:39 IST