पुणे
राज्यात पुन्हा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. आज (दि.२) रोजी कोकण, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामानात झालेल्या बदलामुळे खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. राज्यात कुठे कुठे हलक्या सरी देखील कोसळत आहेत. आज (ता. २) कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे.
Published on: 02 August 2023, 10:33 IST