विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

27 August 2020 10:35 AM By: भरत भास्कर जाधव


बंगालच्या उपसागराच्या उत्तर आणि वायव्य भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता काही प्रमाणात वाढली आहे. त्यांचे रुपांतर चक्राकार वाऱ्यांमध्ये झाले आहे. त्यामुळे विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. मात्र ही स्थिती अधिक सक्रिय नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. याबरोबर दक्षिण उत्तर रायलसीमा दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. दरम्यान राजस्थानच्या नैत्रऋ भागात काही ददिवसांपासून मॉन्सूनची आस असलेला पट्टा उत्तर भागात ते बंगालच्या उपसागरादरम्यान सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर भारतातील काही पाऊस पडत आहे. दरम्यान एक जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पावासाचा चांगला जोर असल्याने धरणेही भरु लागली आहेत. दरवर्षी दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाला. मात्र राज्यातील इतर पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक हजेर लावली.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार व तुळशी तलाव भरुन वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून कमी प्रमाणाक पाऊस होत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बरसल्याने धरणांतील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १२ धरणांतून सध्या विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा वगळता अन्य नद्याचे वाढणारे पाणी स्थिर झाले आहे. पाऊस कमी असल्याने पाटबंधारे विभाग येत्या दोन दिवसांत धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण आणखी कमी करण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून विसर्ग ३० हजार क्युसेकपर्यंत कमी झाल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर झाली. 

विदर्भ Monsoon monsoon rain rainfall मॉन्सून मॉन्सून पाऊस vidarbha
English Summary: Chance of rain in sparse places in Vidarbha today

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.