पश्चिमी वाऱ्यामुळे हवामानात बदल जाणवत आहेत. बदलेल्या हवामानामुळे दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यासह राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील ओडिशा, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, आणि विदर्भा लगतच्या भागात एक चक्रीय वाऱ्याचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुले मराठवाडा. कर्नाटक आणि तामिळनाडू सह कोमोरियन परिसरावर हे वारे सक्रिय आहे. मागील २४ तास - मागील २४ तासा दरम्यान आसामच्या पश्चिमी जिल्ह्यातील काही भागात आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पाऊसाचे हवामान निर्माण झाले होते. यासह पुर्वेकडील भारत, झारखंडच्या काही भागात आणि ओडिशाच्या उत्तरीकडील भागात जोरदार पाऊस झाला.
Published on: 25 April 2020, 01:30 IST