News

राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस काही भागात पाऊस पडेल. दरम्यान आज खानदेशातील धुळे, नंदुरबार, व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, या जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Updated on 02 October, 2020 8:55 AM IST


राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस काही भागात पाऊस पडेल. दरम्यान आज खानदेशातील धुळे, नंदुरबार, व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, या जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उद्या शनिवारी आणि रविववारी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे सातारा. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, या भागातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. मराठावाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात कडक ऊन पडून उकाडा वाढणयाची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कोकणातील मालवण येथे मध्यम पाऊस पडला असला तरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. अनेक भागात पावसाची उडीप असल्याने शेतीकामे वेगाने सुरु झाली आहेत. मध्य महाराष्ट्रातही आटपाडी येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काही ठिकाणी सरी कोसळल्या मराठावाड्यातहबी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली.

English Summary: Chance of Rain in Central Maharashtra - Meteorological Department
Published on: 02 October 2020, 08:54 IST