News

मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली आहे. उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडतील. काही ठिकाणी मेघगर्दना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले.

Updated on 17 March, 2021 10:55 AM IST

मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली आहे. उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडतील. 

काही ठिकाणी मेघगर्दना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले.उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. या क्षेत्राची आज आणि उद्या आणखी तीव्रता वाढून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

 

काही ठिकाणी अंशत: हवामान राहणार असून राज्यातील उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यातच पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू झाल्याने वातावरणात वेगाने बदल होऊ लागले आहेत. रात्रीची थंडी कमी होत असली तरी पहाटे काही प्रमाणात गारठा असतो, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ३९.९ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येत्या काळात पूर्वमोसमी पावसाबरोबर उन्हाचा चटका वाढणार असल्याने कमाल तापमानात वाढ होणार आहे.

English Summary: Chance of pre-monsoon rains in next two-three days
Published on: 17 March 2021, 10:53 IST