News

पाच ते सहा दिवस गुजराच्या दक्षिण भाग परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील इतर भागातील पाऊस बंद झाला आहे.

Updated on 21 August, 2020 9:33 AM IST


पाच ते सहा दिवस गुजराच्या दक्षिण भाग परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील इतर भागातील पाऊस बंद झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सरकले आहे. यामुळे शुक्रवार आणि शनिवारी मराठवाडा वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर राज्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. शनिवारी कोकणातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र फारसे सक्रिय झालेले नाही. हे क्षेत्र वायव्य भागात सरकल्याने काही प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. पण पावसाचा जोर कमी राहणार आहे. सध्या उडिसाच्या उत्तर भाग परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर उडिसाच्या उत्तर भाग आणि झारखंड या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

ही स्थिती पुढील तीन ते चार छत्तीसगड आणि मध्यप्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर उत्तर भारतात असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, अजमेर, गुना ते बंगालच्या उपसागरात रविवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील काही भागात जोरदार पाऊस पडेल.

English Summary: Chance of moderate rainfall in Vidarbha including Konkan
Published on: 21 August 2020, 09:33 IST