गेले काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. पण आता परतीच्या मॉन्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात काही अंशी ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. आज सातारा, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. उत्तर अंदमान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे रविवारपासून कोकण वगळता राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान सोलापूर येथे ३५.४ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत २.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली.
महाबळेश्वर येथे १६० अंश सेल्सिअस सर्वात कमी कमी किमान तापमान नोंदविले गेले. पावसामुळे विदर्भातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. दरम्यान उद्याही वातावरणात बदल होणार असून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत असून पावसासाठी वातावरण बनत आहे.
Published on: 09 October 2020, 09:52 IST