News

राज्यासह देशात वाढलेले तापमानाने नागरिकांना हैरान केले होते, आता तापमानाचा पारा कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील काही भागासह देशातील इतर राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे.

Updated on 29 May, 2020 1:13 PM IST

 

राज्यासह देशात वाढलेले तापमानाने नागरिकांना हैरान केले होते, आता तापमानाचा पारा कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील काही भागासह देशातील इतर राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे.  यामुळे तापमानात घट होऊन राज्यात आलेली उष्ण लाट कमी होण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तविला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फान वादळामुळे उत्तरेकडील उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राकडे आल्याने आठवडाभर विविध भागात उष्ण लाट आली होती.  वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये उन्हाचा चटका वाढला होता.  राजस्थानातील चुरू येथे देशातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान उत्तर आणि मध्य भारतात २८ ते ३१ मेच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुर्व आणि पुर्वे उत्तर भागातील काही भागासह आसाम आणि बंगालमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर १ किंवा २ जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार होईल.

पंजाब, हरियाणा, चंडीगड आणि दिल्लीमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, हरियाणाच्या गुडगावमध्ये शुक्रवार आणि शनिवारी ढगाळ वातावरण असेल.  यामुळे तापमानात घट होणार आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ३० मेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.  दरम्यान उत्तर प्रदेशात पश्चिम विक्षोम सक्रिय असल्याने तेथील तापमान कमी झाले आहे.  महाराष्ट्रातही तापमान कमी झाले आहे. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, येथे उष्ण लाट आहे. उर्वरित भागातील लाट ओसरली आहे.  पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उद्यापासून राज्यात वादळी पावसाला सुरूवात होणार असून सोमवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

English Summary: Chance of heavy rains in the state from tomorrow
Published on: 29 May 2020, 01:07 IST