राज्याच्या अनेक भागात मॉन्सूनचा पाऊस धुवाधार बरसत आहे. आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार कायम राहणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या मध्य भागातून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे. तर पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. पावसाला पोषक प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर कायम आहे.
आज (ता. १३) कोकणातील पालघर, रायगड मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतही दमदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात बहुतांश भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.कमी दाब क्षेत्र झाले ठळक : दक्षिण ओडिशा आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत कायम आहे.
कमी दाब क्षेत्र झाले ठळक : दक्षिण ओडिशा आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत कायम आहे.अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरजोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, चंद्रपुर, गडचिरोलीजोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : धुळे, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.
ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या मध्य भागातून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे. तर पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. पावसाला पोषक प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर कायम आहे.आज (ता. १३) कोकणातील पालघर, रायगड मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतही दमदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात बहुतांश भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
Published on: 14 July 2022, 05:20 IST