News

राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, विदर्भात, अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Updated on 16 July, 2020 2:17 PM IST


राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, विदर्भात, अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून मराठावाड्यातही हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  दरम्यान आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.  यात रायगड, ठाणे , पालघर, पुणे, सातारा, नाशिक, जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे.

मॉन्सूनचा आस असलेला दाबाचा पट्टा सुरतगडपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. यातच पश्चिम किनारपट्टीवर हवेच्या खालच्या थरात जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणात पावसाने जोर धरला आहे. विदर्भातही मुसळधार पाऊस पडत आहे,  मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या  ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.  नाशिक जिल्ह्यातही वरुणराजाने हजेरी लावली. निफाडमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे.  दरम्यान देशातील इतर राज्यातही जोरदार पाऊस होत आहे. मागील २४ तासात गोव्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. आंध्रप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, ओडिसा, कर्नाटकातील किनारपट्टीवर, पुर्वी उत्तर प्रदेश, पुर्वी बिहार, उप - हिमालयी, पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरातमधील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला.

येत्या २४ तासात महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि गोव्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरातच्या पुर्व भागात, कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग, उप - हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्किम आणि आसाममधील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आंध्रप्रदेश, तेलंगानातील काही भागात,  दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्वी बिहारमधील काही भागातही हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

English Summary: Chance of heavy rains in Central Maharashtra, Vidarbha
Published on: 16 July 2020, 02:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)