आज कोकण, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

07 July 2020 01:10 PM By: भरत भास्कर जाधव

सौराष्ट्र आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले. च आहे. तर झारखंड आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. आज कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागांत पाऊस ओसरणार असून, पुढील काही दिवस तो विश्रांती घेईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सोमवारी (६ जुलै) विदर्भ आणि मराठवाडय़ातील तुरळक भागात जोरदार पाऊस पडला. गेल्या चोवीस तासांत मुंबई, ठाण्यासह कोकणात अनेक ठिकाणी मोठय़ा पावसाची नोंद झाली. राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी चोवीस तासांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. या भागांत शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे. सध्या गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण विभागांत सर्वच ठिकाणी आणि प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यंमध्ये पाऊस कायम राहणार आहे.

 

Monsoon rainy season kokan vidarbha heavy rainfall मॉन्सून मॉन्सून पाऊस कोकण विदर्भ
English Summary: chance of heavy rainfall in kokan and vidarbha

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.