News

हवामान खात्याने घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी झालेल्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागातील पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Updated on 01 September, 2023 4:58 PM IST

पुणे

कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरु आहे. धरणलोट क्षेत्रात देखील पाऊस असल्याने पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. तसंच विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने घाटमाथ्यावर देखील रेड अलर्ट दिला आहे.

मुंबईला पूर्वी ऑरेज अलर्ट देण्यात आला होता. हवामानात बदल झाल्याने ऑरेज अलर्ट वरुन मुंबईला रेड अलर्ट दिलाय.  मुंबईच्या काही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. 

दरम्यान, विदर्भाच्या काही भागात देखील पावसाची  शक्यता आहे. तर अमरावती, अकोला, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, नागपूर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

English Summary: Chance of heavy rain with lightning in the state
Published on: 27 July 2023, 11:14 IST