मराठवाडा शुक्रवार दि.७ ऑक्टोबर पासुन संपूर्ण मराठवाड्यात रविवार दि. ९ पर्यन्त तीन दिवस जोरदार पावसाची तर सोमवार दि.१० पासुन १४ पर्यन्त मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. मध्य व प.महाराष्ट्र २- खान्देश व नाशिकसह नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पर्यंतच्या १० जिल्ह्यात आजपासुन पुढील ४ दिवस म्हणजे
सोमवार दि. १०ऑक्टोबर पर्यन्त मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.Monday Moderate to heavy rain is likely till October 10.मात्र मंगळवार दि.११ ते १४ ऑक्टोबरपर्यंतच्या ४ दिवसात ह्या १० जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
तुरी ची गळ आणि उपाय तूर पिकाच्या वाढीकडे द्या अशाप्रकारे लक्ष होईल बक्कळ उत्पन्न
कोकण व विदर्भ ३- मुंबईसह संपूर्ण कोकण तसेच विदर्भात मात्र आजपासुन आठवडाभर म्हणजे शुक्रवार दि.१४ ऑक्टोबर पर्यन्त जोरदार पावसाचीच शक्यता जाणवते.
४-सध्या अजुनही परतीच्या पावसात विशेष प्रगती नसुन त्याची उत्तर भारतातील सीमा आहे त्याच ठिकाणी म्हणजे उत्तरकाशी आग्रा ग्वाल्हेर ह्या शहरातूनच जात आहे. ५- बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडून व सभोंवतालचा परिसरापर्यंत दिनांक ७,८,९ ऑक्टोबरपर्यन्तच्या ३ दिवसात गडगडाटीसह जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे सकाळच्या दिर्घकाळ जाणवणारे धुके,रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी, भूस्खलन,
ह्यातून निर्माण होणाऱ्या रस्ते प्रवासातील अडचणी असे सध्याचे वातावरण विशेषतः वरिष्ठ यात्रेकरुंना धोक्याचे ठरु शकते. कोणत्या वातावरणीय बदलानुसार सध्या कोसळतोय महाराष्ट्रात हा पाऊस ह्या व्यतिरिक्त आठवड्यात एकाकी काही बदल झाल्यास लगेचच लिहिले जाईल. शेतकऱ्यांनी कामाचे नियोजन त्यानुसार करावे असे वाटते. वर क्रं. ६ मधील माहिती हवामान साक्षरता प्रबोधनासाठीच दिली आहे असे समजावे.
माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.), IMD Pune.
ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.
Published on: 09 October 2022, 02:45 IST