पुणे
राज्यात दमदार पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. तर रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
सध्या कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी सुरूच असून, उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. कोकण, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा, दक्षिण कोकणापासून उत्तर केरळ सक्रिय आहे.
Published on: 26 July 2023, 11:14 IST