News

राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे. सातारा, कोल्हापूर, या जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातही हलक्या सरी पडत आहेत. तर मराठवाडा व विदर्भात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे.

Updated on 26 October, 2020 10:17 AM IST


राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, या जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातही हलक्या सरी पडत आहेत. तर मराठवाडा व विदर्भात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. दरम्यान आजही कोकणातील काही जिल्हे आणि सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कर्नाटकाची किनारपट्टी आणि अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण आणि राज्यातील इतर भागात जोरदार पाऊस पडत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी  हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मराठवाडा काही अंशी ढगाळ हवामान राहणार आहे.दरम्यान सध्या राज्यातील काही भागात होत असलेल्या पावसामुळे धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यात होत असलेल्या पावासामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. साधरण पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून सोयाबीन, बाजरी, कांदा, पिके सडू लागली आहेत.

ऊस पिकेही आडवी झाल्याने वजन कमी होण्यास सुरुवात झाली आहे. शेतातील पाणी अजूनही कमी न झाल्याने पिके पूर्णता वाया गेली आहेत. ज्या ठिकाणी  पावसाने उघडीप दिली आहेत. तेथे भात काढणीला सुरुवात झाली असली तर तुरळक ठिकाणी  होत असलेल्या पावसाने भात कामे खोळंबत आहे. अनेक भागात काढणी  केलेली पिके पाण्यातच असल्याचे चित्र आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने शुक्रवारी सायंकाळी चांगलीच हजेरी लावली. इंदापूर, राजगुरूनगर येथे ४६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

English Summary: Chance of heavy rain in some parts of the state
Published on: 26 October 2020, 10:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)