पुणे
राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या मान्सूनने दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारताच्या काही भागांमध्ये नॉर्मल ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पातील बहुतेक भागांमध्ये आणि वायव्य आणि मध्य भारताच्या पश्चिम भागांच्या अनेक भागांमध्ये नॉर्मल पेक्षाही कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
Published on: 01 August 2023, 05:51 IST