News

रेशन कार्ड महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. ज्याप्रकारे आधार आणि पॅन कार्ड महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे रेशन कार्ड देखील तितकेच महत्त्वाचे आहे.जर अनेक सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल रेशन कार्ड अनिवार्य आहे.

Updated on 22 May, 2022 11:08 AM IST

 रेशन कार्ड महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. ज्याप्रकारे आधार आणि पॅन कार्ड महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे रेशन कार्ड देखील तितकेच महत्त्वाचे आहे.जर अनेक सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल रेशन  कार्ड अनिवार्य आहे.

 तसेच आपल्याला माहित आहेच की या कार्डाच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिकांना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध केले जाते. परंतु त्यामध्ये असे बरेच नागरिक आहेत ते रेशन कार्ड साठी अपात्र असताना बनावट पद्धतीने तयार केलेल्या रेशन कार्ड च्या माध्यमातूनअनेक योजनांचा लाभ घेत आहेत.

आता सरकारने या संबंधी अपात्र रेशन कार्ड धारकांच्या तपासण्याचे आदेश दिले असून कठोर कारवाई करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. टीव्ही 9हिंदी ने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील असे अपात्र नागरिकांचे रेशनकार्ड रद्द केले जाण्याची शक्यता असून जे नागरिक बनावट रेशन कार्ड तयार करून रेशन योजनेचा लाभ उठवीत आहेत अशा लोकांचे रेशन थांबवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील काही नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

या नियमांच्या  अनुषंगाने उत्तराखंड, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्य सरकारांनी  आपापल्या राज्यांमध्ये रेशन कार्ड तपासणीचे आदेश दिले असून रेशन योजनेसाठी जे नागरिक अपात्र आहेत अशा नागरिकांच्या रेशन कार्डची तपासणी करून ते रद्द करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. अशा अपात्र रेशन कार्ड धारकांची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मागवली आहे.

 कोणाचे रेशन कार्ड रद्द केले जाणार?

 मिळालेल्या माहितीनुसार, ज्या नागरिकांकडे शस्त्र परवाना, चार चाकी वाहन, घरात एसी आहे जे नागरिक सरकारी नोकरी करतात, घरातील एखादी व्यक्ती कर भरते, ज्यांच्याकडे अडीच एकर पेक्षा जास्त जमीन आहे आणि त्यांचे मासिक वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा सर्व नागरिकांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत.

तसेच जे नागरिक शासकीय विभागांमध्ये कॉन्ट्रॅक्टर वर कार्यरत आहेत आणि या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांचेही रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असल्याची माहिती बिहार मधल्या सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

बिहार सरकारने देखील अशा अपात्र नागरिकांच्या बनावट पद्धतीने तयार केलेल्या रेशन कार्डची तपास करण्याचे आदेश दिले असून अशा सर्व रेशन कार्ड योजनेसाठी अपात्र नागरिकांच्या रेशन कार्डची तपासणी केली जाईल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:राज्यातील 31 जिल्ह्यातील 185 तालुक्यातील 5 हजार पेक्षा जास्त शेतकरी मधमाशी पालन करून कमवत आहेत चांगला नफा

नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! जास्त पावसात सोयाबीन खराब होते, तर सोयाबीनच्या जातींची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरेल खूप फायद्याची

नक्की वाचा:Big breaking: पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

English Summary: centrl government order to check elagibility to ration card and canceld it
Published on: 22 May 2022, 11:08 IST