केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७ हजार ३४८ कोटी रुपये टाकले आहेत. मागच्या महिन्यात कोविड-१९(COVID-19) मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते, त्यानंतर हे पैसे टाकण्यात आले होते. ऑगस्ट - जुलै पर्यंत ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये देण्याचे ध्येय आहे. लॉकडाऊनच्या काळात हा पैसा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
गरीब कल्याण योजनेंतर्गंत १.७ लाख कोटींचा मदत निधी केंद्राने जाहीर केला होता. यातील एक भाग म्हणजे पंतप्रधान -किसान या योजनेचा २०२०-२१ चा पहिला हफ्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावा. पॅकेज जाहीर झाल्यापासून पंतप्रधान-किसान योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी 1 एप्रिल रोजी 65 टक्क्यांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पंतप्रधान शेतकऱी सन्मान निधी योजना २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. यातून प्रत्येक लाभार्थ्याला दरवर्षी ६ हजार रुपये हफ्त्यातून दिले जातात. शासनाच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४३ टक्के लाभार्थ्यांना येत्या सहा दिवसात पैसे मिळतील असे सांगण्यात आले.
Published on: 07 April 2020, 06:44 IST