News

COVID-19 मुळे कृषी व्यवसायाला फटका बसत असून शेतमाल भाज्या आणि फळांच्या विक्रीत मोठी समस्या निर्माण होत आहे. वाहतूक बंद नसल्याने भाज्या आणि फळे बाजारात अधिक प्रमाणात येऊ शकत नाही.

Updated on 05 May, 2020 3:20 PM IST


COVID-19 मुळे कृषी व्यवसायाला फटका बसत असून शेतमाल भाज्या आणि फळांच्या विक्रीत मोठी समस्या निर्माण होत आहे.  वाहतूक नसल्याने भाज्या आणि फळे बाजारात अधिक प्रमाणात येऊ शकत नाही.  त्यामुळे या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकार गाव पातळीवरील ऑनलाईन रिटेल चेन तयार करण्याच्या विचाराधीन आहे. सध्या खासगीरित्या सरकार  कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत  आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्याच्या ऑनलाईन व ऑफलाइन ऑर्डर घेत आहे.  ऑनलाईन आणि ऑफलाईन घेण्यासाठी आऊटलेट सुरु करण्यात आली  आहेत. यासह काही मोबाईल एप्पच्या मदतीनेही ऑडर घेतली जाणार आहे. 

हे महत्त्वकांक्षी काम कॉमन सर्व्हिस सेंटर  Common Service Centres (CSC), मार्फत केले जात आहे. या डिजिटल पद्धतीने गावातील ६० कोटी जनतेला ३.८ लाख सीएससी च्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे.  सीएससीचे आऊटलेट्स हे खासगीरित्या सुरू करण्यात आले आहेत. परंतु यावर आयटी मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली हे केंद्र चालविण्यात येत असून आउटलेट्सला भाजीपाला, दूध, डाळी, फळे आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री व पुरवठा करण्याचे काम सोपविण्यात आले आहे, अशी माहिती सीएससीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश त्यागी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

ग्राहक ऑनलाईन पद्धतीनेही वस्तूंची खरेदी करु शकता. वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी गाव पातळीवरील उद्योजक (व्हीएलई) किंवा किरकोळ व सीएससीच्या माध्यमातून केले जात आहे.  गाव पातळीवरील उद्योजक हे ऑफलाईननेही ऑर्डर घेऊन कमी वेळात वाहतुकीची व्यवस्था करत एका दिवसात वस्तू पोहचवला जातो. हे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारखं असून हे ग्रामिण भागासाठी आहे. दोन आठवड्यापुर्वी आम्ही याची सुरुवात केली. दोन आठवड्यातच दोन हजार सीएससी केंद्र आमच्याशी जुडले आहेत. साधरण १२ हजार गावात वस्तूंचा पुरवठा केला जात असल्याचे त्यागी म्हणाले.

English Summary: Centre Starts e-Retail Chain for Rural India
Published on: 05 May 2020, 03:19 IST