News

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने 2020-21 या वर्षात बारा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एकूण 1,149.10 कोटी रुपयांचे वाटप केले.

Updated on 22 July, 2021 3:58 PM IST

 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने 2020-21 या वर्षात बारा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एकूण 1,149.10 कोटी रुपयांचे वाटप केले.

लोकसभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी अतारांकित प्रश्नाद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घेतलेल्या पावलांचा तपशील मागवला होता. त्यातून ही सगळी माहिती समोर आली.

 शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कुठले योजनेसाठी किती निधी दिला याचा तपशील दिला

  • राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन साठी 153.36 कोटी
  • पीएमकेएसवाय  च्या प्रति बुंद  अधिक पीक घटकांच्या योजनेत -400 कोटी
  • एनएफएसएम ( ओएस अंड ओपी ) योजनेसाठी 39.38 कोटी रुपये
  • कृषी मशीनीकरणवर उप मिशन साठी 77.92 कोटी रुपये
  • मृदा आरोग्य व्यवस्थापन योजनेसाठी 0.46 कोटी रुपये
  • मृदा आरोग्य कार्ड योजनेसाठी 5.69 कोटी रुपये
  • राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 290.88 कोटी रुपये

 

  • कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी योजनेसाठी 17.41 कोटी रुपये
  • आर ए डी स्कीम साठी दहा कोटी
  • एकात्मिक विकास मिशन फलोत्पादनासाठी 130 कोटी रुपये
  • सब मिशन ओन अग्रो फॉरेस्ट्री  साठी दोन कोटी
  • परंपरागत कृषी विकास योजनेसाठी 13 कोटी रुपये देण्यात आले.

पाच वर्षात राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने बारा योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुमारे 6353.97 कोटी रुपये चे वाटप केले.

English Summary: central gov.give to 1149 crore for farmer incom double
Published on: 22 July 2021, 03:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)