शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार नेहमी कोणत्या न कोणत्या योजना काढत असते ज्यामुळे शेतकरी फायद्यात राहतो. शेतकरी वर्ग सुद्धा नवीन नवीन योजनांची वाट पाहत असतो जसे की आता ही केंद्र सरकारने नवीन योजना आणली आहे. जर तुम्ही शेती करत आहात सोबतच तुम्ही जनावरे सुद्धा पाळत असाल तर केंद्र सरकारने तुमच्यासाठी पशुपालक किसान क्रेडिट कार्ड योजना आणली आहे. भारताची अर्थव्यवस्थासाठी पशुपालन खूप महत्त्वाचे आहे जे की देशात संपुर्ण ८ कोटींपेक्षा जास्त कुटुंब आहेत जी पशुपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतकऱ्यांना काही आर्थिक अडचणी आल्या तर जनावरे विकतात तर काहींना विकत घेण्यासाठी पैसे नसतात तर काही शेतकऱ्यांकडे जनावरांचा चारा घेण्यासाठी पैसे नसतात. शेतकऱ्यांना यामध्ये अडचणी येऊ नये तसेच त्याची परिस्थिती सुधारावी म्हणून ही योजना चालू केली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत कर्ज घ्यायचे आहे त्यांना १५ फेब्रुवारी पर्यंतच अर्ज करण्याची मुदत आहे.
योजना अंतर्गत कर्जावर सबसिडी सुद्धा उपलब्ध :-
पशुपालक किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त १ लाख ८० हजार रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी घेतली आहे. या कर्जावर केंद्र सरकार ३ टक्के अनुदान देणार आहे तर राज्य सरकार सबसिडी देऊ शकतात. हरियाणा मध्ये या योजनेवर ७ टक्के अनुदान भेटत आहे.
शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे केंद्र सरकारचे आवाहन :-
पशुपालक किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. जे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे. देशात जास्त प्रमाणात पशुपालन व्हावे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. हरियाणा मध्ये सर्वात प्रथम ही योजना सुरू झाली आहे तर दुसरीकडे हळूहळू ही योजना सुरू होण्यास सुरू झाले आहे. ६० हजार शेतकऱ्यांना ८०० कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे. हरियाणा मधील पाच लाख पशुपालक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे तुम्हाला जरी अर्ज करायचा असेल तर १५ फेब्रुवारी च्या आत कर्ज करावा.
पशुपालक किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे :-
१. शेतकरी कोणतेही गोष्ट गहाण न ठेवता कर्ज घेऊ शकतात.
२. शेतकरी किसान क्रेडिट कार्ड बँकेत डेबिट कार्ड म्हणून सुद्धा वापरू शकतात.
३. या योजनेअंतर्गत तुम्ही म्हशीवर ६०,२४९ रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकता.
४. कर्ज घेतले की व्याजाची रक्कम १ वर्षाच्या आत भरली तर पुढील रक्कम मिळेल.
५. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यातील कायमस्वरूपी वास्तव्याचे पुरावे सादर करावे.
६. पशु आरोग्य प्रमाणपत्र गरजेचे आहे तसेच ज्या जनावरांचा विमा आहे त्यांनाच कर्ज भेटेल.
७. अर्जदाराचे आधार कार्ड तसेच बँक खते व मतदान कार्ड आणि मोबाईल नंबर बँकेशी जोडलेला असावा.
ॲनिमल फार्मर किसान क्रेडिट कार्डसाठी कशा प्रकारे करावा अर्ज :-
पशुपालक किसान क्रेडिट कार्ड योजनेतील शेतकरी अर्ज करण्यासाठी जवळच्या बँकेत जाऊ शकतात. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅनकार्ड व मतदान कार्ड आणि योजनेचा अर्ज सोबत असणे गरजेचे आहे. सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला १ महिना नंतर कर्ज उपलब्ध होईल.
कोणत्या जनावरांसाठी किती कर्ज मिळेल :-
१. गाई - ४०,७६३ रुपये.
२. म्हैस - ६०,२४९ रुपये.
३. मेंढी - ४०७३ रुपये.
४. कोंबडी - ७२० रुपये.
या योजनेच्या माध्यमातून ज्यांना गाई, म्हैस, मेंढी तसेच शेळीपालन व कुक्कुटपालन करायचे असेल तर ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते मात्र त्यासाठी ४ टक्के व्याजदर असणार आहे.
Published on: 10 January 2022, 12:26 IST