मत्स्यव्यवसाय आज प्रगती करत असलेला व्यवसाय असून 14 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. परंतु या व्यवसायाचा अजून तरी हवा तेवढा विकास झालेला नाही. मत्स्यपालन क्षेत्रामध्ये अधिकाधिक तरुणांनी यावे यासाठी केंद्र सरकारकडून देखील आव्हान करण्यात आला असून पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशात निलक्रांती आणण्याच्या अभियानाला देखील मंजुरी देण्यात आली आहे.
नक्की वाचा:Prawn Fish Farming व्यवसायातून मिळेल लाखोंची कमाई, अशा पद्धतीने सुरू करा हा व्यवसाय
इस्राईलच्या मदतीने चिलापी माशांचे होईल मोठे उत्पादन
जर आपण चिलापी या माशा विषयी माहिती घेतली तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक व्यापारी दृष्टिकोनातून विक्री होणारा हा मासा आहे. मत्स्यव्यवसाय मध्ये या माशाला सागरातील चिकन असे देखील संबोधले जाते.
जागतिक पातळीवर चिलापी मासाचा व्यापार हा व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप प्रसिद्ध झाला आहे. कारण या माशांची वाढ अगदी जलद गतीने होते व कमी खर्चात जास्त पैदास होणारा हा मासा आहे.
या माशाचे व्यवस्थित तंत्रज्ञान शुद्ध पद्धतीने व्यावसायिक उत्पादन घेता यावे त्यासाठी मेसर्स फाऊंटनहेड फार्मस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चिलापी माशांची पैदास यासाठी एक वेगळे उत्पादन व्यवस्था कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे सुरू केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून या क्षेत्राच्या शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून देशात निलक्रांती आणण्याच्या अभियानाला मंजुरी देण्यात आली.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्था तंत्रज्ञान विकास महामंडळाने महाराष्ट्रातील नवी मुंबईतील खासगी संस्था, मेसर्स फाउंटन हेड ऍग्रो फार्म प्रायव्हेट लिमिटेडला पाठबळ दिले आहे.
ही संस्था इस्रायलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन नर जातीच्या चिलापी माशांची उत्पादन करण्यासाठी आधुनिक असा प्रकल्प उभारणार आहे.
इस्रायलची ही कंपनी अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बांध घातलेल्या कोरडवाहू शेतजमिनी वर, तसेच नदीतून मिळणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स्यशेती केली जाणार आहे. अगदी शेतामध्ये असलेल्या कृत्रिम तलावात सारख्या क्षेत्रात देखील हि मत्स्यशेती होऊ शकेल.
Published on: 19 August 2022, 11:30 IST