News

भारतीय शेतकऱ्यांना डाळींचे अधिकाधिकउत्पादन करता यावे यासाठी मदत म्हणून आवश्यक ती सर्व पावले ग्राहक व्यवहार विभाग उचलणार आहे. सोबतच डाळींच्या निर्बाध आयातीसाठी आयातदारांनाही सहाय्य केले जाईल, जेणेकरुन 2023 मध्ये ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळी उपलब्ध होतील, असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह, यांनी आज नवी दिल्ली येथे डाळी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.

Updated on 16 December, 2022 7:35 AM IST

भारतीय शेतकऱ्यांना डाळींचे अधिकाधिकउत्पादन करता यावे यासाठी मदत म्हणून आवश्यक ती सर्व पावले ग्राहक व्यवहार विभाग उचलणार आहे. सोबतच डाळींच्या निर्बाध आयातीसाठी आयातदारांनाही सहाय्य केले जाईल, जेणेकरुन 2023 मध्ये ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळी उपलब्ध होतील, असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह, यांनी आज नवी दिल्ली येथे डाळी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.

येत्या काही वर्षांत जागतिक स्तरावर डाळींची उपलब्धता वाढेल कारण म्यानमारमधून उत्पादनात वाढ अपेक्षित असून, ते येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आफ्रिकन देशांमध्येही पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जे ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध होईल. यामुळे कडधान्याखालील क्षेत्र व्याप्तीमध्ये वाढ झाली होऊन येत्या वर्षात डाळींची जागतिक उपलब्धता चांगली राहण्याची अपेक्षा आहे.

7th Pay Commission Latest News: प्रतीक्षा संपली, गोंधळ संपला... 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी बातमी

यामुळे डाळींच्या आयातीचा सातत्यपूर्ण प्रवाह चालू राहील आणि उपलब्धतेशी संबंधित समस्या दूर करता येतील. सिंह यांनी पुढे देशांतर्गत उत्पादन आणि डाळींची विशेषत: तूर, उडीद आणि मसूर यांची आयात या दोन्ही बाबींच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला.

LIC Policy: सरकार देत आहे सर्वोत्तम ऑफर! तुम्हाला फक्त 74 रुपयांच्या गुंतवणुकीवर 48 लाख रुपये मिळतील; लवकर अर्ज करा

English Summary: Central government support to importers of pulses
Published on: 16 December 2022, 07:35 IST