News

नवी दिल्ली: आगामी खरीप हंगामासाठी देशात पुरेसा खतांचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी रसायने आणि खत मंत्रालयाचा खत विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असा माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे. आत्तापर्यंतची उपलब्धतेची स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

Updated on 10 April, 2020 8:39 AM IST


नवी दिल्ली:
आगामी खरीप हंगामासाठी देशात पुरेसा खतांचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी रसायने आणि खत मंत्रालयाचा खत विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असा माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे. आत्तापर्यंतची उपलब्धतेची स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशा प्रमाणात खतांची मात्रा पुरविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. खतांची निर्मितीवाहतूक आणि उपलब्धतेवर खत विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्या अनुषंगाने विविध राज्य सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकविषयी स्वतंत्र ट्विट करताना गौडा म्हणाले, "कर्नाटक राज्याचा विचार केला तर राज्यात बियाणेखते आणि कीटकनाशकांची कमतरता नाही. यासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारशी सतत संवाद साधत आहोत. आजमितीस कर्नाटक सरकारकडे 7.3 लाख टन साठा आहे आणि त्यांची मासिक गरज ही 2.57 लाख टन आहे."

खत विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्र उपक्रम नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) ने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की नांगलभटिंडापानिपत बीट आणि विजापूर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी युरिया बाजारपेठेत नियमितपणे पाठविण्यात येत आहे.

English Summary: central government ensuring adequate availability of fertilizers in the country
Published on: 10 April 2020, 08:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)