News

लद्दाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर चीनविरोधात भारतात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देखील सुरू करण्यात आली होती. कें

Updated on 30 June, 2020 10:45 AM IST


लद्दाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर चीनविरोधात भारतात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देखील सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारनेही चीनविरोधात कंबर कसली असून चीनला भारत सरकारने डिजिटल झटका दिला आहे. 

बुलेट नाही पण वॉलेटने चीनवर हल्लाबोल करण्यास भारत सज्ज झाला असून त्या दिशेने भारत सरकारने एक पाऊल उचलले आहे. चीनचे 59 अॅप्स बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामध्ये कमी वेळेत खूप लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश आहे. टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी अॅप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अॅक्ट कलम 69 अ अंतर्गत 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

भारत आणि चीनच्या सीमेवर पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव कायम आहे. १५ जून रोजी झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशातून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली होती. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला आहे.  मात्र या बंदीनंतर या कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो भारतीय बेरोजगार होण्याची चिन्ह दिसत आहेत.

बंदी घालण्यात आलेले एप्स

TikTok (टिकटॉक)

Shareit (शेअर इट)

Kwai (केवाई)

UC Browser (यूसी ब्राऊजर)

Baidu map (बायडू मॅप)

Shein (शीन)

Clash of Kings (क्लॅश ऑफ किंग्ज)

DU battery saver (डीयू बॅटरी सेव्हर)

Helo (हेलो)

Likee (लाईक)

YouCam makeup (यूकॅन मेकअप )

Mi Community (एमआय कम्युनिटी)

CM Browers (सीएम ब्राऊजर)

Virus Cleaner (व्हायरस क्लीनर)

APUS Browser (एपीयूएस ब्राऊजर)

ROMWE (रोमवी)

Club Factory (क्लब फॅक्टरी)

Newsdog (न्यूजडॉग)

Beutry Plus (ब्यूट्री प्लस)

WeChat (व्ही चॅट)

UC News (यूसी न्यूज)

QQ Mail (क्यू क्यू मेल)

Weibo (वीबो)

Xender (झेन्डर)

QQ Music (क्यू क्यू म्युझिक)

QQ Newsfeed (क्यू क्यू न्यूज फीड)

Bigo Live (बिगो लाईव्ह)

SelfieCity (सेल्फी सिटी)

Mail Master (मेल मास्टर)

Parallel Space 31. Mi Video Call – Xiaomi (पॅरालल स्पेस 31. एमआय व्हिडीओ कॉल- शाओमी)

WeSync (व्ही सिंक)

ES File Explorer (ईएस फाईल एक्सप्लोरर)

Viva Video – QU Video Inc (विवो व्हिडीओ - क्यूयू व्हिडीओ इंक)

Meitu (मीटू)

Vigo Video (विगो व्हिडीओ)

New Video Status (न्यू व्हिडीओ स्टेटस)

DU Recorder (डीयू रेकॉर्डर)

Vault- Hide (वॉल्ट हाईड)

Cache Cleaner DU App studio (कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ)

DU Cleaner (डीयू क्लीनर)

DU Browser (डीयू ब्राऊजर)

Hago Play With New Friends (हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स)

Cam Scanner (कॅम स्कॅनर)

Clean Master – Cheetah Mobile (क्लीन मास्टर- चीता मोबाईल)

Wonder Camera (वंडर कॅमेरा)

Photo Wonder (फोटो वंडर)

QQ Player (क्यू क्यू प्लेयर)

We Meet (वी मीट)

Sweet Selfie (स्वीट सेल्फी)

Baidu Translate (बायडू ट्रान्सलेट)

Vmate (व्हीमेट)

QQ International (क्यू क्यू इंटरनॅशनल)

QQ Security Center (क्यू क्यू सिक्युरिटी सेंटर)

QQ Launcher (क्यूक्यू लॉन्चर)

U Video (यू व्हिडीओ)

V fly Status Video (व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ)

Mobile Legends (मोबाईल लिजेंण्ड्स)

DU Privacy (डीयू प्रायव्हसी)

English Summary: central government ban 59 Chinese apps in india
Published on: 30 June 2020, 10:45 IST