News

साखर हंगाम 2022-23( ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाला प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये एफआरपी केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Updated on 04 August, 2022 8:27 AM IST

साखर हंगाम 2022-23( ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाला प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये एफआरपी केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 काय आहे समितीचा निर्णय?

 जर आपण समितीचे निर्णयाचा विचार केला तर प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये हा भाव 10.25 टक्के साखर उताऱ्यात आहे व त्यापेक्षा जास्त अथवा कमी उतारा आल्यास भाव कमी किंवा जास्त होईल.

नक्की वाचा:'या' शेतकऱ्यांना मिळणार, 4000 रुपये तर या तारखेला मिळणार १२ वा हप्ता?

प्रत्येक 0.1 टक्का वाढीव उतारा मागे प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये वाढीव तर प्रत्येक 0.1 टक्का कमी उतारामागे प्रतिक्विंटल तीन हजार पन्नास रुपये कमी भाव मिळेल. मात्र साखर उतारा हा साडे नऊ टक्क्यांच्या खाली घसरल्याने भावात आणखी कपात केली जाणार नाही.

अशा शेतकऱ्यांना प्रति टन 2821 रुपये या दराने कारखान्याकडून पैसे दिले जातील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सरकारने मागील आठ वर्षात उसाच्या या एफआरपीत एकंदरीत 34 टक्क्यांनी वाढ केली आहे.

नक्की वाचा:अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

त्यासोबतच साखर उताऱ्याचा बेस रेट देखील 9 टक्‍क्‍यांवरून 10.25 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2021-22 च्या हंगामात एफ आर पी 2900 रुपये होती तर उसाचे उत्पादन  3530 लाख टन होते यातून ऊस उत्पादकांना एक लाख 15 हजार 196 कोटी रुपये मिळाले होते.

प्रत्यक्षात वाढ किती?

 जरी आता प्रत्यक्षात एफआरपीत दीडशे रुपये वाढ दिली असली तरी साखर उताऱ्याचा बेस 10 टक्‍क्‍यांवरून 10.25 टक्के करण्यात आल्यामुळे दहा टक्के उतार्‍याच्या आधार गृहीत धरला तर शेतकऱ्याच्या हातात फक्त 112 रुपये 50 पैसे प्रति टन वाढीव मिळणार आहेत.

नक्की वाचा:सोयाबीन उत्पादकांनो द्या लक्ष! सोयाबीनच्या शेतात कीड आणि आळींचा प्रादुर्भाव, वेळीच करा प्रतिबंध

English Summary: central goverment taking decision to growth frp in canecrop
Published on: 04 August 2022, 08:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)