पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी देशाला संबोधित करत असताना तीनहीनवीन कृषी कायदा मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी देशाला संबोधित करत असताना तीनहीनवीन कृषी कायदा मागे घेण्याची मोठी घोषणा केली.
या भाषणात मोदी म्हणाले की, सरकारने हे कृषी कायदे चांगल्या उद्देशाने आणले होते परंतु काही शेतकऱ्यांना आम्ही ते समजावून सांगू शकलो नाहीत.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, येत्या काळात शेतकर्यांचे ताकद वाढवण्यासाठी 10000 हजार एफपीवो किसान उत्पादक संघटना स्थापन करण्याची योजना आहे. ज्यावर सात हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. शेतकरी हितासाठी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी एकापाठोपाठ एक पाऊल टाकत आहे.
याच मोहिमेचा भाग म्हणून सहकारी शेतकऱ्यांच्या या मोहिमेत देशात तीन नवीन कृषी कायदा आणण्यात आले होते देशातील लहान शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला हवा. ही मागणी अनेक दिवसांपासून देशात सुरू होती. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळेस देखील यावर संशोधन चर्चा झाली, विविध अंगांवर विचार मंथन झाले आणि हे कायदे आणले गेले. देशातील अनेक शेतकरी संघटनांनी त्याला पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी खूप ऋणी आहे असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सीमांत शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कायदे आणले गेले होते परंतु आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना या कायद्याविषयी समजावू शकलो नाहीत.
या बाबतीत आम्ही समजावताना शेतकऱ्याचे संवाद चालू होता. शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही. ज्या कायद्यावर त्यांचा आक्षेप होता त्या कायद्यातील तरतुदीबदलांचे सरकारने मान्य केले होते.पुढे बोलताना ते म्हणाले की ही वेळ कोणाला दोष देण्याची नाही.मी आज संपूर्ण देशाला कळवण्यासाठी आलो आहे की, आम्ही तीनही कृषी कायदा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात होणाऱ्या संसद सत्रात याबाबतची पूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
Published on: 19 November 2021, 10:19 IST