News

सध्या बाजारपेठेमध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरू झाली आहे. परंतु अद्याप पर्यंत हमीभाव केंद्र मार्फत हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली नव्हती.

Updated on 19 February, 2022 10:45 AM IST

सध्या बाजारपेठेमध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरू झाली आहे. परंतु अद्याप पर्यंत हमीभाव केंद्र मार्फत हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली नव्हती.

शेतकऱ्यांना खुल्या बाजारात बाजारभावाप्रमाणे विक्री करावी लागत होती.परंतु या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता हरभरा हमीभावाने विकता  येणार आहे. शासनाने हरभऱ्याला पाच हजार 250 रुपये हमीभाव ठरवला असून शेतकऱ्यांना विक्री साठी आवश्यक असलेली नोंदणी करता येणार आहे. येत्या 15 मार्चपर्यंत नोंदणी करायचे आहे व त्यानंतर प्रत्यक्षात विक्री असे नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

ही कागदपत्रे लागतील

तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ याठिकाणी आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा त्यासोबत तलाठ्याच्या सहीसह पिक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाची नोंद असलेला सातबारा, आधार लिंक केलेले बँक पासबुकची झेरॉक्स इत्यादी कागदपत्र जमा करावे लागणार आहेत. केंद्र सरकारने ठरवलेल्या किमान हमी भावानुसार शेतीमाल खरेदी करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, महाएफपीसी पुणे, पृथ्वाशक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनी अहमदनगर आदींच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे.

हमीभाव  केंद्रांवर कागदपत्रे जमा करायचे असतील तर त्यासाठी शेतकऱ्यांकडे एक महिन्याचा कालावधी असून 16 फेब्रुवारीपासून याला सुरुवात झाली आहे तर 15 मार्चपर्यंत नोंदणी प्रक्रिया खुली राहणार आहे. नोंदणी केल्यानुसार शेतमालाची खरेदी करता येणार असून खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली आहे.

English Summary: central goverment take important about gram crop msp center
Published on: 19 February 2022, 10:45 IST