1. बातम्या

सरकारच्या या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात उतरणार

सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला पोचले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात तेलाचीभाववाढ सगळ्यांना चटके देते. अशा पार्श्वभूमीवर सरकारने बुधवारी पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा एक कच्च्या मालाच्या किमतीमध्ये 2022 पर्यंत कपात केली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
edible oil

edible oil

सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला पोचले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात तेलाचीभाववाढ सगळ्यांना चटके देते. अशा पार्श्वभूमीवर सरकारने बुधवारी पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा एक कच्च्या मालाच्या किमतीमध्ये 2022 पर्यंत कपात केली आहे.

या सोबतच कृषी उपकरामध्ये ही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचा परिणामखाद्य तेलाच्या किमती कमी होण्यावर होणार आहे.

 यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले की, 14 ऑक्टोबर पासून शुल्क कपात लागू होईल आणि 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहील.

 कच्चा पाम तेलावर आत्ता 7.5 टक्के एआयडीसी लागू होईल, या शुल्कात कपातीनंतर कच्चे  पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील प्रभावी सीमाशुल्क  अनुक्रमे 8.25 टक्के,5.5 टक्के आणि 5.5 टक्के असेल.याशिवाय याशिवाय सूर्यफूल, सोयाबीन, पामोलिन आणि पामतेला  वरील मूलभूत सीमाशुल्क सध्याच्या 32.5 टक्क्यांवरून 17.5टक्के करण्यात आले आहे.

 

 स्वयंपाक तेलाच्या किमती तपासण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढावा यासाठी केंद्राने खाद्य तेलात वरील आयात शुल्क कमी केले आहे. तसेच तेलाच्या होणाऱ्या साठेबाजी ला आळा बसावा यासाठी घाऊक विक्रेते, मिल मालक आणि रिफायनर्सयांना त्यांच्याकडिल तेलाच्या उपलब्ध साठ्याची  माहिती वेबपोर्टलवर उपलब्ध करण्यास सांगितले आहे.

( स्त्रोत-MPC News)

English Summary: central goverment take dicision to less impoort duty on palm oil and soyabion oil Published on: 14 October 2021, 07:52 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters