News

देशात ह्यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. शासनाच्या धोरणामुळे देखील शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे तसा मोबदला मिळाला नाही आणि शेतकऱ्यांचे परिणामी उत्पन्न कमी झाले एवढेच नाही तर शेतमाल हा हमीभावपेक्षा कमी किमतीत विकला गेला त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी आलेला खर्च देखील काढता आलेला नाही. परंतु उशिरा का होईना केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मोदी सरकारने आता खाद्यवरील सबसिडी वाढवली आहे आणि त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होणार आहे.

Updated on 20 October, 2021 7:23 PM IST

सोमवारी केंद्रीय रसायन आणि खाद्य मंत्री मनसुख मांडविया ह्यांनी एएनआयशी (ANI) बोलताना हे वक्तव्य केले. माननीय मंत्री महोदय ह्यांनी सांगितले की, वर्तमान मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्याच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत शिवाय देशातील खाद्याची पूर्तता करण्यासाठी खाद्याची आयात केली जात आहे त्यामुळे खाद्याचे भाव हे आधीपेक्षा अधिक झाले आहेत पण केंद्रातील सरकार खाद्याचे भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खाद्यावर सबसिडी वाढवत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना खाद्य स्वस्त पडेल आणि शेतीमध्ये येणारा खर्च हा कमी होईल व परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल

नेमके कोणत्या खाद्यावर किती मिळणार सबसिडी

»देशात आधी युरिया ह्या खाद्यावर 1500 रुपये प्रति बॅग सबसिडी दिली जात होती ती वाढवून 2000 रुपये प्रति बॅग करण्यात आली आहे.

»DAP खाद्यावर आधी 1200 रुपये सबसिडी शेतकऱ्यांना मिळत होती ती आता 1650 रुपये एवढी मिळणार आहे.

»NPK नायट्रोजेन, फोसफरस, पोटॅशियम ह्या खाद्यावर आधी 900 रुपये सबसिडी मिळत होती जी आता 1500 रुपये एवढी करण्यात आली आहे.

»SSP खाद्यावर आधी 315 रुपये सबसिडी मिळत होती आता ती 375 रुपये एवढी करण्यात आली आहे.

 सरकारने रब्बी हंगामासाठी ह्या सबसिडी द्वारे सुमारे 28000 करोड रुपये मंजूर केले आहेत. देशात खरीप हंगामाची काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी काढणीचे काम पूर्ण झाले आहे आणि रब्बी हंगामाच्या पिक लागवडीसाठी तयारी सुरु झाली आहे. ह्या रबी हंगामात शेतकऱ्यांना ह्या सबसिडीचा फायदा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय मंत्री मांडवीया ह्यांनी सांगितले की जरी आंतरराष्ट्रीय बाजारात खतांची किमत वाढली असली तरी सरकार शेतकऱ्याचा खर्च कमी कारण्यासाठी सबसिडी वाढवत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल.

English Summary: central goverment take dicision to growth subsidy on fertilizer
Published on: 20 October 2021, 07:23 IST