News

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि ह्या कृषिप्रधान देशासाठी सरकारे नवनवीन योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करतात आणि शेतकरीचे उत्पन्न वाढवण्याचा तसेच त्यांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करतात. जमिनीवर ह्या योजनाचे, धोरणाचे किती प्रमाणात अंमलबजावणी होते हा वादाचा विषय असू शकतो? पण सरकार नेहमीच हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यास प्रयत्नरत असते. असाच एक निर्णय मोदीसरकारने पण घेतलाय. केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी गोव्याचा दौरा केला. दौऱ्यावर असताना त्यांनी केंद्रीय कृषी योजनाच्या अंमलबजावणी संदर्भात गोवा राज्य सरकारच्या मंत्रीची बैठक घेतली.

Updated on 01 October, 2021 7:01 PM IST

. ह्या बैठकीत चंद्रकांत कावळेकर आणि इतर कृषी अधिकार्री हजर होते. ह्या समीक्षण बैठकीत कृषी मशीन बनवणाऱ्या कंपन्या आणि डीलर्सला जे कृषीशी निगडित साधने, मशीन, उपकरणे असतात त्या प्रोडक्टची किंमत संपूर्ण भारतात समान असावे असे निर्देश देण्यात आले.

माननीय केंद्रीय मंत्री करंदलाजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्याचे कृषी मंत्री ह्यांचे कृषीच्या क्षेत्रात चांगल्या कामगिरीबद्दल प्रशँसा केली. त्यांनी गोवा सचिवालयात गोव्यातील महिला शेतकरी दर्शन पेडणेकर यांचा सत्कार केला, दर्शन पेडणेकर ह्यांना आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा मिळाली आहे. त्यांना शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाचे अवलंब केल्याबद्दल प्रशंसा मिळाली.

एका सरकारी निवेदनात, स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे की, "कृषी अवजारे आणि साहित्याची किंमत प्रत्येक राज्यात ही समान असावी. ती देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशात वेगळी असता कामा नये.  भारत सरकारने ह्यासाठी डीलर्स आणि उत्पादकांना देशभरात एकसमान किंमत ठरवण्याचे व त्यासाठी याद्या लावण्याचे निर्देश दिले आहेत.

 केंद्रीय मंत्रिनी गोव्याच्या कृषी मंत्र्यांना पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी ही पूर्णतः डिजिटल करावी असे निर्देश दिलेत. म्हणजे गोव्यातील शेतकऱ्यांची पिकपाहणी ही डिजिटल पद्धतीने करावी असे आदेश देण्यात आले.

शिवाय, मंत्री महोदयानी उसाच्या उत्पादनावर भर द्यावा आणि उसापासून गूळ तयार करण्यात यावा असा सल्ला दिला. कारण गूळच्या मागणीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली वाढ झाली असल्याचे त्यांनी कथन केले.

 शेतकरी मित्रांनो सरकार स्वस्त दरात देते अवजारे…..

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीसाठी यंत्राची आवश्यकता असल्यास तुम्ही सीएचसी फार्म मशीनरी (CHC Farm Machinery) अँपवर ऑर्डर देऊन, शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री (साधने) अत्यंत स्वस्त दरात मिळवू शकता.

English Summary: central goverment take dicision agri machinary benifit to one plateform
Published on: 01 October 2021, 04:54 IST