News

मागील काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की खतांच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाढत्या किमतींमुळे अजून आर्थिक फटका बसत आहे.

Updated on 20 April, 2022 9:20 PM IST

मागील काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की खतांच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना  त्यांच्या वाढत्या किमतींमुळे अजून आर्थिक फटका बसत आहे.

आता काही दिवसांनी खरीप हंगाम तोंडावर येईल. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांच्या किमती बाबत दिलासा मिळावा यासाठी सरकार खत अनुदानात सुधारणा करण्याच्या तयारीत आहेत. अशा आशयाची माहिती खत विभागाने दिली. याबाबतीतले प्रेझेंटेशन कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने आयोजित केलेल्या खरीप मोहीम 2022 ते 23 साठी राष्ट्रीय कृषी परिषदेत केले.

नक्की वाचा:Health Tips : उन्हाळ्यातच काकडी का खावी? वाचा याविषयी सविस्तर

या अधिवेशनासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने नुसार, खत विभागाने या बाबतीत म्हटले की, 2021 पासून खत आणि कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

तसेच आंतर मंत्रालयीन समितीने खरीप 2022 साठी नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि सल्फर साठी पोषण आधारित अनुदान दरामध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. जे केवळ या हंगामासाठी असेल असं प्रेझेंटेशन मध्ये म्हटले गेले आहे. या आधारे अनुदान निश्चित केले जाणार आहे. मार्च 2022 मध्ये खताची सरासरी आंतरराष्ट्रीय किंमत निश्चित केली जाईल.

नक्की वाचा:मोठी बातमी! सोने तारण ठेऊन SBI देणार शेतकऱ्यांना 'एवढे' लोन

 खतांच्या किमती वाढण्यासाठी रशिया आणि युक्रेन  यांच्यातील युद्ध कारणीभूत

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत दरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे खतांच्या वाढत्या किमती यांना यापूर्वी जबाबदार धरण्यात आले आहे खरं तर या दोन देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर  निर्बंध लादले आहेत, याचा परिणाम हा संपूर्ण पुरवठासाखळी वर झाला आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या किमतीत वाढ झाली आहे.इफकोने 1 एप्रिल रोजी खतांच्या किमतीत वाढ केली होती यामध्ये डीएपी आणि एनपीके  या खतांच्या किमती वाढल्या होत्या. (स्त्रोत किसानराज)

English Summary: central goverment make plan to improvement in fertilizer subsidy
Published on: 20 April 2022, 09:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)