मोदी सरकारने इ श्रम पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय कडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे जवळजवळ 38 कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे.
या कामगारांमध्ये बांधकाम कर्मचारी तसेच प्रवासी कर्मचारी व घरेलू कामगार यांचा समावेश आहे. या पोर्टल वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी 14434 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सरकार कामगारांना एक श्रम कार्ड देणार आहे. या कार्डवर एक बारा अंकी युनिक नंबर असणार आहे. या कार्ड च्या माध्यमातून देशातील कोट्यावधी असंघटित कामगारांना एक नवीन ओळख मिळणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड देशभरात वैध राहील.
सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांचा एक डाटाबेस तयार करत असून त्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या माध्यमातून सामाजिक सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण करण्याचा उद्देश आहे. मंगळवारी कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई श्रम पोर्टलच्या लोगोचे अनावरण केले होते. मागच्या वर्षी कोरोनामुळे झालेले लॉक डाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांनी आपापल्या कामाच्या ठिकाणाहून घराकडे परत वाट धरली होती.
त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. त्यामुळे अशा कामगारांचा डेटाबेस तयार करण्याकडे लक्ष देण्यात आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला लवकरात लवकर डेटाबेस तयार करण्याचे सांगितलं होतं. जेणेकरून कामगारांच्या सामाजिक कल्याण व इतर गरजा सहज पूर्ण करता येतील हा त्यामागील उद्देश होता.
Published on: 27 August 2021, 09:25 IST