पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या कॅबिनेट च्या एका महत्त्वाच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीदिली.
त्यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचा कालावधी वाढवण्यात आला असून आता ही योजना 2024 पर्यंत लागू राहणार आहे.
या योजनेअंतर्गत 2.95 कोटी जनतेला मिळणार घरकुल
याबद्दल माहिती देताना केंद्रीय मंत्रीअनुराग ठाकूर यांनी सांगितले की, पंतप्रधान आवास घरकुल योजना अंतर्गत 2024 पर्यंत कालावधी वाढवण्यात आला असून या योजनेअंतर्गत 2.95कोटी जनतेला घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आतापर्यंतम्हणजे मार्च 2021 पर्यंत 1.97 लाखो कोटी खर्च करण्यात आले आहेत.
त्यातील जवळ जवळ 1.44लाखो कोटी तर केंद्र सरकारने खर्च केले आहेत. आता या योजनेचा 2024 पर्यंत कालावधी वाढवण्यात आला असून त्यासाठी जवळजवळ 2 लाख 17 हजार 257 कोटी रुपयांच्या अधिकच या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
काय आहे या योजनेचा उद्देश?
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत प्रामुख्याने ज्यांना कुणाला राहण्यासाठी पक्के घर नाही, अशा जनतेला स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरकुल प्रदान करण्यात येते व या योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.
Published on: 09 December 2021, 08:54 IST