केंद्राच्या एका निर्णयाने तुर उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तूर आयातीची मुदत दोन दिवसात संपणार होती जेव्हा ही मुदत संपेल तेव्हा तुरीच्या भावाला थोडाफार आधार मिळेल असा एक अंदाज होता.
परंतु सरकारने मंगळवारी तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली.यामुळे ज्या देशांकडूनभारत तूर आयात करतो त्या देशांकडून आयात सुरूच राहणार आहे. विशेष म्हणजे ही तूर आयात ज्या देशांकडून केले जाते त्यामध्ये बर्मा, मलावी, म्यानमार इत्यादी देशातून केली जाते आणि विशेष म्हणजे आपल्याकडील तुरीचा हंगाम सुरू होण्याआधीच या देशांमधून तूर आपल्याकडे दाखल होते.
नक्की वाचा:अतिथीसारखा आला आहे हरभऱ्यावर हा नवीन रोग; वाचा या रोगाची कारणे आणि लक्षणे
केंद्र सरकारने तूर आयात मुक्त केल याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तसे पाहायला गेले तर आपल्याकडे तुरीचे उत्पादन खूपच कमी झाले आहे. परंतु आयात जास्त प्रमाणात झाल्यानेतुरीचे दर म्हणावे तेवढे बाजारपेठेत मिळताना दिसत नाहीये. मुक्त तूर कराराचा कालावधी हा 31 मार्च 2022 पर्यंत होता. ही मुदत दोन दिवसाच्या आत संपणार होती. त्यामुळे आपल्याकडील एकूण तुरीचे उत्पादन आणि देशाची गरज पाहता आपल्याकडील खुल्या बाजारात तुरीचे दर वाढतील असा अंदाज असताना सरकारने परत यामध्ये पाय घातला.
तुरीची आयात तिला वर्षभर मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम केले आहे. सरकारने नवीन नियमानुसार 31 मार्च 2023 पर्यंत उडीद आणि तूर आयातीला मुदतवाढ दिली आहे.
नक्की वाचा:आनंदाची बातमी : बँकेची कर्जमर्यादा वाढवली; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
या निर्णयाचा परिणाम या हंगामातच नाहीतर पुढच्या हंगामात सुद्धा
जर आपण तुर निर्यातीचा विचार केला तरम्यानमार हा देश तुरीची मोठ्या प्रमाणात भारताला निर्यात करतो. म्यानमारमधील तूर ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारात येते. या हंगामात देखील आपल्याकडील तूर बाजारात येण्यापूर्वी म्यानमार मधून आलेली तूर दाखल झाली होती. आता केंद्राने आयातीचे मुदत पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत वाढवल्याने म्यानमार येथील तूर पुढील हंगामात म्हणजे सप्टेंबर 2022 पासून आवक होणाऱ्या तुरीची भारतात आयात होईल.
ही आयात होणारी तूर जानेवारीपर्यंत बाजारपेठेत दाखल होईल. म्हणजेच या आयातीवर केवळ याच हंगामावर नाही तर पुढील वर्षीच्या हंगामा वरही किमतींवर दबाव असेल असे जाणकारांचे मत आहे.बाजारातभाव मिळत नसल्याने तुरीचे क्षेत्र देखील घटण्याचा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Published on: 30 March 2022, 11:27 IST