News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीच्या बैठकीत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, २०१८-१९ च्या साखर हंगामासाठी ऊसाला प्रती क्विंटल २७५ रुपये वाजवी आणि किफायतशीर मूल्य द्यायला मान्यता देण्यात आली आहे. २०१८-१९ या साखर हंगामासाठी उसाचा उत्पादन खर्च १५५ रुपये प्रती क्विंटल आहे.प्रती क्विंटल २७५ रुपये वाजवी आणि किफायतशीर किमत, उत्पादन खर्चाच्या ७७.४२ टक्के जास्त आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५०% पेक्षा जास्त किमत देण्याच्या वचनाची पूर्तता होत आहे.

Updated on 19 July, 2018 11:24 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीच्या बैठकीत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, २०१८-१९ च्या साखर हंगामासाठी ऊसाला प्रती  क्विंटल २७५ रुपये वाजवी आणि किफायतशीर मूल्य द्यायला मान्यता देण्यात आली आहे. २०१८-१९ या साखर हंगामासाठी उसाचा उत्पादन खर्च १५५ रुपये प्रती क्विंटल आहे.प्रती क्विंटल २७५ रुपये वाजवी आणि किफायतशीर किंमत, उत्पादन खर्चाच्या ७७.४२ टक्के जास्त आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५०% पेक्षा जास्त किमत देण्याच्या वचनाची पूर्तता होत आहे.

२०१८-१९ या साखर हंगामातले ऊसाचे अपेक्षित उत्पादन लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ८३,००० कोटी रुपयापेक्षा जास्त एकूण मोबदला दिला जाईल. शेतकऱ्यांना उपयुक्त अशा उपाययोजनांच्या माध्यमातून त्यांना त्यांची रक्कम वेळेवर मिळेल याची सरकार खातरजमा करणार आहे.

२०१८-१९ च्या साखर हंगामासाठी म्हणजेच १ ऑक्टोबर २०१८ पासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी, हे वाजवी आणि किफायतशीर मूल्य लागू होणार आहे.

साखर क्षेत्र हे कृषी आधारित महत्वाचे क्षेत्र असून ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यावर थेट रोजगारा द्वारे अवलंबून असणारे ५ लाख कामगार   तसेच कृषी मजूर आणि वाहतूक यासह संलग्न क्षेत्रात काम करणाऱ्यांचीही उपजीविका यावर अवलंबून आहे.

English Summary: Central Cabinet Approves on Fair & Remunerative Price (FRP) provided by Sugar factories for the Sugar Season of 2018-19
Published on: 19 July 2018, 11:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)