केंद्रीय नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी सांगितले की,या चालू कृषी हंगामात केंद्र धान (कच्चा तांदूळ) खरेदी करेल आता सध्या तेलंगणामध्ये खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून लवकरच हे देशभर सुरू राहील.भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक आणि जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे.
धान खरेदीसासाठी मोठे प्रयत्न याआधीच सुरु :
पीयूष गोयल म्हणाले केंद्र शेतकर्यांना मदत करण्यास सदैव तयार आहे, परंतु काही राजकीय पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार त्यांनी केली. केंद्र देशभर धान खरेदीसाठी जात आहे ही केंद्राची "जबाबदारी" आहे . यापूर्वी सरकारने 2021-22 पीक वर्षात भारतीय अन्न महामंडळ (FCI) आणि राज्य संस्थांद्वारे किमान आधारभूत किंमत (MSP) ऑपरेशन अंतर्गत तांदूळ आणि धान खरेदीसाठी सरकार शेतकऱ्यांना विक्रमी रु. 2.7 लाख कोटी हस्तांतरित करण्याची बजेट मध्ये तरतूद केली होती.
तामिळनाडू , आंध्र प्रदेशसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये एप्रिल 2022 पासून रब्बी हंगामासाठी भातखरेदी सुरू होण्याची अपेक्षा असताना आतापर्यंत 120 दशलक्ष टन (MT) धान आणि गहू खरेदीसाठी 2.37 लाख कोटी रुपये शेतकर्यांना हस्तांतरित केले गेले आहेत.एफसीआय आणि राज्य एजन्सी चालू पीक हंगामात दक्षिणेकडील राज्यांमधील शेतकऱ्यांकडून सुमारे 17 मेट्रिक टन धान खरेदी करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
FCI आणि राज्य एजन्सी MSP ऑपरेशन्सद्वारे मुख्यत,पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांकडून धान आणि गहू खरेदी करतात. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले अत्यंत अनुदानित अन्नधान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना पुरवले जाते तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी बफर स्टॉक म्हणून ठेवले जाते.
Published on: 22 March 2022, 12:44 IST