डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी विद्यालयात १६ मार्च २०२२ रोजी तंत्रज्ञान आणि यंत्र प्रात्यक्षिक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात विदर्भामधील विविध भागातील आलेल्या शेतकऱ्यांनी भाग घेतले. शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघता या प्रात्यक्षिक कार्यक्रमात आलेल्या शेतकर्यांकरिता कृषी व अवजारे विभागाने तयार केलेल्या पेरणी यंत्र, बिबीफ प्लांटर, कापणी यंत्र तसेच कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान योजने द्वारे तयार केलेले दाल मिल, बीज निष्कासन यंत्र. तेलबिया प्रक्रिया केंद्र, कडधान्य मूल्यवर्धन साखळी यांचे सुद्धा प्रात्यक्षिक देण्यात आले सोबतच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत या विभागाने विकसीत केलेल्या सौर चूल, सौर शुष्कक, सौर कीटक सापळा यंत्र यांचे सुद्धा प्रात्यक्षिक देऊन शेतकऱ्यांच्या प्रष्णांचे निरसन करण्यात आले.
या मेळाव्याला विविध जेष्ठ शास्त्रज्ञ आणि यंत्र तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले. सुरवातीला प्रास्ताविकेत डॉ. प्रमोद बकाने, संशोधन अभियंता यांनी आयोजित केलेल्या १ दिवसीय मेळाव्याचे महत्व आणि रूपरेषा समजावून सांगितली. डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी यांनी यंत्र प्रात्यक्षिकता का महत्वाची आहे आणि त्यांचा शेतकऱ्यांना थेट लाभ कसा होऊ शकतो समजून सांगितले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. ययाती तायडे, सहयोगी अधिष्ठाता, कृषी यांनी शेतकऱ्यांसमोर विद्यापीठात विक्रमीत झालेल्या विविध तंत्रज्ञान व पिकाचे वाण यांच्या बद्दल माहिती दिली व त्यांच्या बद्दल शेतकर्यांना अवगत करून दिले आणि येत्या काळात उत्कृष्ठ शेतीसाठी या तंत्रज्ञानाची जास्त गरज आहे
व त्यांच्या बद्दल शेतकर्यांना अवगत करून दिले आणि येत्या काळात उत्कृष्ठ शेतीसाठी या तंत्रज्ञानाची जास्त गरज आहे असे संबोधित केले. अध्यक्षीय मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. आर. एम. गाडे साहेब, संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पंदेकृवी अकोला यांचे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले. त्यांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान सध्या वर्तमान शेतीत कसे अंगीकृत करून त्याचा शेतीसाठी कसा फायद करून घ्यावा व त्यातून दुप्पट उत्पन काढण्याचे याचे मार्गदर्शन केले. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डॉ. एम. एम. देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. पी. पी. नलावडे, संशोधन अभियंता यांनी केले.
मार्गदर्शनाच्या सत्रात कृषी अधिकारी श्रीमती ज्योती चौरे यांनी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन द्वारे राबविण्यात येत असलेल्या
विविध योजनांचे महत्व आणि त्याचा लाभ कसा घ्यावा आणि त्या करिता लागणारी कागद पत्रे या सगळ्यांची विस्तृत माहिती दिली व विद्यापीठ आणि कृषी विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पश्वाना सोडविण्यासाठी उपस्थित आहे याची खात्री करून दिली.
तसेच या मेळाव्याला लाभलेले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे आणि विविध विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. देशमुख, डॉ. पी. पी. नलावडे, डॉ. एस. एस. ठाकरे, डॉ. एस. के. ठाकरे, डॉ. व्ही. बी. शिंदे, श्री. एस. आर. सक्कलकार, डॉ. व्ही. डी. मोहड, दीप्ती धुमाळे, श्री. आर. डी. बिसेन, श्री. खोब्रागडे, श्री. घवघवे. आदी उपस्थित होते.
- गोपाल उगले
Published on: 19 March 2022, 04:44 IST