भारतातील बहुतांश सण हे आर्य-अनार्य म्हणजेच सूर-असुर यांच्या संघर्षाच्या स्मृती आहेत. उदा तुळशी विवाह, बलिप्रतिपदा, दसरा इत्यादी. त्याचप्रमाणे नरक चतुर्दशी हा दिवस देखील अभिमान बाळगावा असा आहे.आम्ही लहानपणी दीपावलीच्या वेळेस सकाळी लवकर नाही उठलो, की वडील म्हणायचे "लवकर उठून आंघोळ करा, उशिरा उठलात तर नरकात जाल." नरकात जायच्या भीतीने आम्ही सूर्योदयापूर्वीच आंघोळ करायचो. कारण नरकात वाईट लोक जातात, तेथे त्यांचा खूप छळ केला जातो, तेथे रवरव नरक असतो, अशा पुराणकथा ऐकल्या होत्या.
नरक जर खरच वाईट असता तर नरक चतुर्दशीला आपण दिवाळी साजरी केली असती का?If Narak was really evil, would we celebrate Diwali on Narak Chaturdashi?. पण आता आम्ही म्हणतो आंघोळीला उशीर झाला तरी चालेल,
जिल्हा परिषद शाळांबाबत सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या हा होणार फायदा
कारण नरक गणातील लोक आपले पूर्वज आहेत, नरक हा पृथ्वीवरच आहे. आपण कृषिसंस्कृतीतील लोक त्यांचे वारदादार आहोत. आपल्या लोकांत म्हणजे नरकात राहायला नक्की आवडेल.गाय हा सर्वार्थाने उपयुक्त पशू आहे. दुसरे नागरीकरण गंगेच्या खोऱ्यात झाले. त्यादरम्यान जगात लोखंडाचा (इसपू १० वे शतक) शोध लागला. त्यामुळे मानवी जीवन अधिक
वेगवान झाले. गंगेच्या खोऱ्यात जंगल साफ झाले. शेती करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे होते. त्यावेळेस गोधन मदतीला आले. आर्य तर यज्ञात गायींचा बळी देत होते. महावीर-बुद्ध हे कृषी संस्कृतीतून आले असल्यामुळे ते यज्ञाविरूद्ध गोरक्षक म्हणून उभे राहिले, ते अध्यात्मिक कारणाने नव्हे, तर भौतिक कारणाने उभे राहिले. त्यामुळे गोभक्षक आर्यांना नाईलाजाने शाकाहारी व्हावे लागले. महावीर आणि बुध्दाने रक्षण केलेली गाय आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. तो आपण दिपावलीत वसुबारस या रुपाने जतन करतो.
लक्ष्मीपूजन हा तर स्त्री संस्कृतीचा सन्मान आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. भटक्या मानवाला खात्रीचे अन्न, राहण्यासाठी घर स्त्रियांनी दिले. अतिरिक्त धान्य (surplus) आले. त्यामुळे मानवी जीवन स्थिर झाले. बरकत आली. मानवी जीवनात भरभराट आली, ती स्त्रीपावलाने म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी आली. हा स्त्री सन्मानाचा उत्सव आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा उत्सव आहे. स्त्री ही हिम्मतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान आहे. ती पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे. तिच्याकडे प्रसव क्षमता आहे. म्हणूनच
निसर्गाने अपत्यप्राप्तीची जबाबदारी स्त्रीकडे दिलेली आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे लक्ष्मीपूजन होय.आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी याच्याप्रती कृतज्ञता म्हणून धनत्रयोदशी आली, असेही मानले जाते. सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त यांचा विजयोत्सव म्हणून दीप म्हणजे दिवा लावण्याची परंपरा आहे, असे म्हटले जाते. वामन नावाच्या कपटी, पाताळयंत्री, क्रूर अशा आर्य नेत्याने
लोककल्याणकारी बळीला छळले, जसे औरंगजेबाने शिवरायांना छळले. शिवाजीराजे मागे हटले नाहीत. बळीराजा मागे हटला नाही. बळी हा जनतेला आनंद देणारा राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. कोणत्याही प्रकारची उणीव नव्हती. म्हणून म्हटले जाते "इडा पिडा टळो l बळीचे राज्य येवोll". आजही प्रजा बळीच्या राज्याची वाट पाहत आहे. बलिप्रतिपदा हा दिवाळीचा महत्त्वाचा दिवस आहे.
बहीण भावाने एकमेकांच्या मदतीला सतत धावून आले पाहिजे. बहीण भाऊ हे सहोदर आहेत. त्यामुळे त्यांचे नाते अतूट आहे. ते सतत वृद्धिंगत राहावे, हाच संदेश दिपावलीत भाऊबीज हा सण देतो. अशा अनेक कल्याणकारी अर्थाने ओतप्रोत भरलेला आनंददायी सण म्हणजे दिवाळी आहे. ही आनंदाची दिवाळी आहे. अंधकार दूर करून जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही दीपावली आहे. अशा दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा!
-डॉ.श्रीमंत कोकाटे
Published on: 24 October 2022, 02:46 IST