शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे बळीराजा अधिक संकटात सापडला आहे आणि त्यामध्ये आता शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्याच्या हाती फक्त साडे नऊ रुपये आले आहेत. जे की या शेतकऱ्याने साडे नऊ रुपये चा चेक बाजार समितीतील व्यापाऱ्याला दिलेला आहे. अशा या परिस्थितीत शेती कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी तरकारी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतायत. जे की मग त्यामध्ये मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी इत्यादी प्रकारची पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतो. सर्व खर्च सोडून त्या शेतकऱ्याच्या हाती फक्त साडे नऊ रुपये आले आहेत.
सर्व खर्च शेतकऱ्याच्या माथी :-
शेतकऱ्यांनी जी घेतलेली तरकारी पिके असतात ती कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत पुणे, मुंबई तसेच सुरत या ठिकाणी रोज पाठवली जातात. जे की या ठिकाणी लिलाव पद्धत वापरून शेतकऱ्याच्या मालाची खरेदी केली जाते. परंतु अतिजास्त बोझा तसेच वाहतूक भाडे इत्यादी सर्व गोष्टींचा बोजा मात्र शेतकऱ्याच्या डोक्यावर दिला जातो.
फराटे यांची मोठी निराशा :-
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील शेतकरी किसन फराटे यांनी आपल्या शेतामध्ये फ्लॉवरची लागवड केली होती. जे की खते आणि औषधे देऊन पीक सुद्धा जोमात वाढले होते. जे की ज्यावेळी फ्लॉवर ची तोडणी केली तेव्हा त्यांनी फ्लॉवर नवी मुंबई साठी रवाना केले. जे की सर्व खर्च वजा करून त्यांना फक्त ९ रुपये ५० पैसे एवढीच पट्टी लागलेली होती. जे की या गोष्टींमुळे किसन फराटे हे संकटात सापडले.
हेही वाचा:-गोंदिया जिल्ह्यात 12 हजार हेक्टरवर धानाचे नुकसान, शेतकरी राजा चिंतेत
उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही :-
बाजारभाव चांगला मिळेल म्हणून फराटे यांनी मोठ्या आशेने फ्लॉवर पिकाची लागवड केली मात्र असे काही घडले की गेलेला खर्च सुद्धा निघू शकला नाही. शेवटी शेवटी सर्व पिकावर नांगर नांगर फिरवण्याची वेळ आली. संबंधित व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्याचा आरोप फराटे करत आहेत. शेतीमालात अशी फसवणूक होत असल्याने शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.
Published on: 17 September 2022, 11:41 IST