News

सध्या उसाचे हंगाम सुरु झाले आहेत, यामुळे कारखाने उसाचे दर किती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना उत्तर प्रदेशमधून एक बातमी समोर आली आहे. साखर कारखान्याकडे जवळपास ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. प्रशासनाने याबाबत वारंवार निर्देश दिले आहेत. नोटिसा बजावल्या तरीही कारखान्याने याची दखल घेतली नाही.

Updated on 07 November, 2022 3:06 PM IST

सध्या उसाचा हंगाम सुरु झाले आहेत, यामुळे कारखाने उसाचे दर किती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना उत्तर प्रदेशमधून एक बातमी समोर आली आहे. साखर कारखान्याकडे जवळपास ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. प्रशासनाने याबाबत वारंवार निर्देश दिले आहेत. नोटिसा बजावल्या तरीही कारखान्याने याची दखल घेतली नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी हर्षिता माथुर यांच्या निर्देशानंतर जिल्हा ऊस विकास सहकारी समितीचे सचिव अशोक कुमार यांनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापन विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणूक, जीवनावश्यक वस्तू अधिनियम आदी अंतर्गत सोरोंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याकडे ऊस बिलाची ३५.३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शिवाय कारखान्याकडे ८२.२२ लाख रुपये ऊस विकास अनुदान थकीत आहे. शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. यामुळे शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. सरकारने वारंवार निर्देश दिल्यानंतरही कारखान्याने ऊस बिले दिलेली नाहीत.

शेवग्याच्या झाडाची पाने आहेत खूपच फायदेशीर, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे न्यौली साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक कुणाल यादव, सरव्यवस्थापक (शुगर सेल) चंद्रभान सिंह, अकाऊंट विभागाचे सरव्यवस्थापक अमित मेहरा, मुख्य वित्त अधिकारी डी. के. श्रीवास्तव, उपाध्यक्ष तेजवीर ढाका, युनिट हेड इसरार अहमद यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोदी सरकारची 60 लाख टन साखर निर्यातीस परवानगी

ऊस विभागाकडून इतर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात देखील अनेक कारखान्यांनी शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या;
ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका वाहतूकदाराचा खून
राज्यात होणार नव्याने स्वयंचलित हवामान केंद्रे, हवामानाची मिळणार अचूक माहिती...
NMNF पोर्टल लाँच: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून NMNF पोर्टल सुरू, शेतकऱ्यांना फायदा

English Summary: case filed against executive director sugarcane bill
Published on: 07 November 2022, 02:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)