News

मिरचीचे तीन तुकडे जरी खाल्ले तरी जागतिक विक्रम होणार आहे एक जास्त तुकडा खाल्ला तर थेट गिनीज वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड. या लवंगी मिरची चे नाव आहे कॅरोलीना रिपर ही मिरची अमेरिकेत पिकवली जाते.

Updated on 23 October, 2021 12:09 PM IST

मिरचीचे तीन तुकडे जरी खाल्ले तरी जागतिक विक्रम होणार आहे एक जास्त तुकडा खाल्ला तर थेट गिनीज वर्ल्ड मध्येरेकॉर्ड. या लवंगी मिरची चे नाव आहे कॅरोलीना रिपर ही मिरची अमेरिकेत पिकवली जाते.

या लेखात आपण या मिरची बद्दल माहिती घेऊ. गावरान मिरची खाल्ले तरी तोंडाची  लाही लाही होते. पण जगात मिरचीचा असा एक प्रकार आहे तो पाहून हैराण होते.

 कॅरोलीना रीपर मिरचीचे वैशिष्ट्य

 कॅरोलीना ऱीपर मिरची एवढीतिखट आहे की जागतिक स्तरावर याची नोंद घेण्यात आली आहे.ही मिरची आपल्या सिमला मिरची सारखे दिसते. या मिरचीचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील मसालेदार मिरची म्हणून नोंदवले  गेले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते कॅरोलीना रिपर सारख्या जगात इतक्या मसालेदार मिरच्या कधीच घडले नाही. एका माणसाने दहा सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात या तीन मिरच्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर त्याचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले होते. त्याच्या अगोदर कोणीही  हीमिरची इतक्या  वेगाने खाली नव्हती. कारण या मिरचीचा छोटासा तुकडा देखील लोकांची स्थिती बिघडू शकतो. मिरचीचा एस यु  (हिट्स युनिट ) 5000 च्या जवळपास असतो. अशा मिरचीचे सेवन करणे मुश्कील असते. 

तर या मिरचीचे एस यु तपासणीही 2012 मध्ये दक्षिण कॅरोलिना येथील विंथलोप विद्यापीठाने केली होती. ज्यामध्ये 15,69, 300 एस एच यु किंवा स्को वेल हीट युनिट सापडले. जे इतर मिरचीच्या तुलनेत 440 पटीने मसालेदार अधिक आहे. त्यामुळे क्वचित लोक सेवन करू शकतात. मिरची चे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील मसालेदार मिरची म्हणून नोंदविले गेले आहे.

English Summary: carolina riper is the most pungent chilli in the world
Published on: 23 October 2021, 12:09 IST